Sunday, November 21, 2010

Saturday, August 29, 2009

Sunday, July 19, 2009

Rakesh jain madhyamik vidyamandir,shivkar (panvel, Maharashtra)

*School name:- Rakesh jain madhyamik vidyamandir,shivkar

*Established on:- 1992

*Management:- Dnyanseva shikshan mandal, New panvel.

*Principal:- Shri. Suresh kanhu Dhawle

*Our inspiration:-
sir.Nirbhay jain
Ma'm.Urmila jain
sir.utsav kapadia
Ma'm.Aanandi vangal
and all wellwishers of shivkar

*Features:-
1) 5th to 10th education available at one place.
2) Nature fresh campus
3) IBT(introduction to basic technology)
4)qualified teaching staff
5)Personal guidance
6) audio-visual devices,slide projector is used in teaching
7) equipped laboratory facility
8) good facility for travelling(By bus or auto-ricksha)
9)Dance & music competition 10)equipped computer lab
11) English speaking & personality development course(partnership with Kotak education foundation,mumbai.)
12)just 4km away from panvel.
13)proposed engineering college near to School.
14)equipped library facility.
15)Gathering ceremony


*Teaching staff (5th to 7th-Morning session):-
1)Sir.Prakash patil
2)ma'm. S.S.Patil 3)sir.Chetan L.Dhawle (9773395317)


*How to go-

(BEST bus 503-Rani laxmi bai chauk to kalamboli)
1)Mumbai to kalamboli via best bus 503->kalamboli to panvel via ST bus or auto.->panvel to shivkar via ST bus or auto.

Or

2)Dadar to panvel & panvel to shivkar via ST bus.

OR

3)panvel railwaystation to shivkar by ST bus (from panvel depot) or autorickshow.
(PLEASE POST COMMENTS.ITS VERY IMPORTANT.)

Wednesday, July 15, 2009

Rakesh jain madhyamik vidyamandir ,Shivkar(Panvel,maharashtra)

शाळेचे नाव: राकेश जैन माध्यमिक विद्यामंदिर, शिवकर

स्थापना:1992

संचालक:ज्ञानसेवा शिक्षण मंडळ ,न.पनवेल.

मुख्याध्यापक: श्री.सुरेश का. ढवळे

शैक्षणिक उपलब्धता:इ.पाचवी ते दहावी(मान्यता प्राप्त)

वैशिष्ट्ये:1)पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षणाची सुविधा
2)निसर्ग रम्य परिसर(नदी,डोंगर)
3)IBT(Introduction to basic technology)
तंत्रज्ञानाची प्राथमिक ओळख
5)वैयक्तिक मार्गदर्शन
6)ऑडिओ व्हिज्युअल डिव्हाईस,प्रोजेक्टरचा अध्यापनात वापर
6)सुसज्ज प्रयोगशाळा
7)प्रवासाची योग्य सोय(बस,रिक्षा)
8)उच्च शिक्षित शिक्षकवृंद
9)नृत्य,संगीत,वक्तृत्व या गुणांना वाव
10)सुसज्ज संगणक कक्षाद्वारे अत्याधुनिक संगणक प्रशिक्षण
11)इंग्लिश स्पिकींग कोर्सची सुविधा
12)पनवेल पासुन फक्त 4 िकमी अंतरावर
13)हाकेच्या अंतरावर इंजिनीयरींग कॉलेज(नियोजित)
14)ग्रंथालयाची सुविधा
15)वार्षिक स्नेहसंमेलन

पाचवी ते सातवी शिक्षकवृंद: (सकाळ सत्र)
1)श्री.प्रकाश पाटील
2)सोे.एस्.पाटील
3)श्री.चेतन ढवळे (9769251929)

Tuesday, July 14, 2009

Megacity, panvel,Navi mumbai (मेगासिटी, पनवेल,नवी मुंबई)

जगातील क्रमांक दोनचे व भारतातील क्रमांक एकचे ऊर्जा शहर म्हणजेच "एनर्जी सिटी" आमच्या पनवेलजवळ व माझ्या शिवकर गावाजवळ होत आहे याचा आम्हा भुमीपुत्रांना फार आनंद होत आहे.मा.मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली
होत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात 50,000 कोटी रु.ची गंुतवणूक आहे.तसेच 2100 एकरच्या विस्तृत जमिनीवर पसरलेला हा अशा प्रकारचा पहीलाच प्रकल्प असणार आहे.मुबईवरील ताण कमी करणे हा या प्रकल्पाचा प्राथमिक हेतु असला तरी परदेशात स्थायिक असणारे अनिवासी भारतीयांसाठी
अलिशान निवासस्थाने,आयटी हब,बॉलीवुड सिटी,टेलीकॉम सिटी,दर्जेदार पायाभुत सुविधा तसेच अनेक वैशिष्टयपुर्ण बाबींचा यात समावेश आहे.हे शहर प्रामुख्याने एनर्जी सिटी,एण्टरटेनमेंट सिटी व आयटी टेलीकॉम सिटी या तीन भागांत विकसित होत आहे.मुंबईपासुन केवळ 70 किमी व नवी मुंबईच्या नियोजीत
अंातरराष्ट्रीय विमानतळापासुन 6-7 किमी अंतरावर असल्याने येथील विकासकामांना वेग आला आहे.त्यामुळे येथे 7.5 लक्ष रोजगारनिर्मीती होणार आहे.स्थानिक भुमीपुत्रांना भराव व बांधकाम याकामी प्राधान्य देण्याचे विकासकांचे धोरण नक्कीच स्तुत्य आहे.परंतु येथील मोठ्या प्रमाणात असणारा नवोदीत तरुण वर्ग मात्र बेरोजगार आहे.विकासकांनी
येथील तरूणांना योग्य प्रशिक्षण देवुन संबंधीत आस्थापनांमध्ये कायम सेवेत घ्यावे.या ठीकाणी
कँाग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्याकडून त्यांच्या फार अपेक्षा आहेत.रिलायन्स सेझ व नुकतेच घडलेले ओएनजीसीने येथील प्रकल्पग्रस्त भुमीपुत्रांच्या तोंडाला पाने पुसण्याचे प्रकरण ताजे असल्याने या पार्श्वभुमीवर शासनाने व विकासकांनी याचा सर्वंकष विचार करावा.व प्रकल्प यशस्वीरित्या साकारावा.
"प्रकल्पासाठी हार्दीक शुभेच्छा!"

प्रथम संपादीत-15-3-2010(15मार्च2010)
-4:26pm

Friday, July 10, 2009

Social awareness - Homosexual relationship/समलैंगिक संबंध-'माणूस'कीला काळीमा

नूकतेच न्यायालयाने कलम 377 रद्द करुन एक 'ऐतिहासिक'पाऊल उचलले आहे.एखाद्या मुद्द्याला कसे व कीती अवास्तव महत्त्व द्यावे याचे जराही तारतम्य न्याय व्यवस्थेला राहीले नसल्याचे हे द्योतक उदाहरण आहे.जेथे एड्स सारख्या असाध्य रोगापासून लोकांना वाचविण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते,तेथेच एड्स सारख्या रोगाचे उगमस्थान असणाय्रा समलैंगिक संबंधांना मान्यता देवून जनसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण सरकारने निर्माण के
ले केले आहे.सामाजिक आरोग्य अबाधीत राखण्यासाठी तसेच मानसिक व शारीरीक आरोग्य टिकवण्यासाठी अशा मुद्द्यांना विरोध करणे सरकारकडून अपेक्षित होते.

Thursday, June 25, 2009

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा

जय महाराष्ट्र वाचकहो!आजचा विषय जरा ज्वालाग्राहीच आहे.अहो,महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न ज्वालाग्राही असणारच!एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानंतर देखील महाराष्ट्राला मुंबईसाठी झगडावे लागत आहे यासारखी शोकांतिका नाही.फक्त निवडणुकीच्या तोंडावर मराठीसाठी व मुंबईसाठी लढणारे? दिसतील.एरव्ही शुकशुकाट!एका नेत्याने मराठीचा मुद्दा उचलताच राजकारणासाठीचे कारण हरवलेल्या इतर नेत्यांना आयतेच घबाड मिळाले.आणि नंतर मग काय आम्हीच मराठीचे कैवारी असल्याच्या अविर्भावात प्रत्येक राजकारणी वावरत होता.मराठीच्या मुद्द्यावर मनसेने प्रचंड यश मिळवल्यावर मात्र मराठीच्या मुद्द्यामधील'दम' राजकारण्यांना जाणवला.याच
मुद्द्यावर येत्या निवडणुकीत वादविवादाच्या फैरी झडणार यात वाद नाही.स्वतः आणि स्वतःचा पक्ष कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याची आता चढाओढ लागेल.या गदारोळात मराठी माणसाने सारासार विचार करुन निर्णय घ्यावा.आम्ही उत्तर भारतीयांसाठी निवडणुकीमध्ये उभे राहतो असे म्हणणारया या उपरांना धडा शिकवावाच लागेल.
मिळालेला विजय हा फक्त उत्तर भारतीयांच्या मतांमुळेच मिळालेला नाही,हे लक्षात घ्यावे.महाराष्ट्राच्या मराठी मातीत राहुन खाऊन तेथेच घाण करणारया या उपरयांइतके धाडस आपले मराठी नेते करतील काय?दिल्लीश्वरासमोर गुडघे टेकणारया मराठी नेत्यांकडून काय अपेक्षा करणार?दक्षिणेकडील लोकांप्रमाणे ज्वलंत भाषाभिमान आपल्या लोकांमध्ये केव्हा निर्माण होणार?केवळ नावाने परप्रांतीय असलेल्या 'रजनीकांत'ला निवडणुकीचे तिकीट नाकारले गेले.आपले संपूर्ण आयुष्य दाक्षिणात्य चित्रपटांसाठीच
वाहून देखिल हा न्याय अाहे.पण महाराष्ट्रात मात्र 'कोणीही यावे टपली मारुन जावे'
अशी परिस्थिती आहे.