Thursday, June 25, 2009

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा

जय महाराष्ट्र वाचकहो!आजचा विषय जरा ज्वालाग्राहीच आहे.अहो,महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न ज्वालाग्राही असणारच!एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानंतर देखील महाराष्ट्राला मुंबईसाठी झगडावे लागत आहे यासारखी शोकांतिका नाही.फक्त निवडणुकीच्या तोंडावर मराठीसाठी व मुंबईसाठी लढणारे? दिसतील.एरव्ही शुकशुकाट!एका नेत्याने मराठीचा मुद्दा उचलताच राजकारणासाठीचे कारण हरवलेल्या इतर नेत्यांना आयतेच घबाड मिळाले.आणि नंतर मग काय आम्हीच मराठीचे कैवारी असल्याच्या अविर्भावात प्रत्येक राजकारणी वावरत होता.मराठीच्या मुद्द्यावर मनसेने प्रचंड यश मिळवल्यावर मात्र मराठीच्या मुद्द्यामधील'दम' राजकारण्यांना जाणवला.याच
मुद्द्यावर येत्या निवडणुकीत वादविवादाच्या फैरी झडणार यात वाद नाही.स्वतः आणि स्वतःचा पक्ष कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याची आता चढाओढ लागेल.या गदारोळात मराठी माणसाने सारासार विचार करुन निर्णय घ्यावा.आम्ही उत्तर भारतीयांसाठी निवडणुकीमध्ये उभे राहतो असे म्हणणारया या उपरांना धडा शिकवावाच लागेल.
मिळालेला विजय हा फक्त उत्तर भारतीयांच्या मतांमुळेच मिळालेला नाही,हे लक्षात घ्यावे.महाराष्ट्राच्या मराठी मातीत राहुन खाऊन तेथेच घाण करणारया या उपरयांइतके धाडस आपले मराठी नेते करतील काय?दिल्लीश्वरासमोर गुडघे टेकणारया मराठी नेत्यांकडून काय अपेक्षा करणार?दक्षिणेकडील लोकांप्रमाणे ज्वलंत भाषाभिमान आपल्या लोकांमध्ये केव्हा निर्माण होणार?केवळ नावाने परप्रांतीय असलेल्या 'रजनीकांत'ला निवडणुकीचे तिकीट नाकारले गेले.आपले संपूर्ण आयुष्य दाक्षिणात्य चित्रपटांसाठीच
वाहून देखिल हा न्याय अाहे.पण महाराष्ट्रात मात्र 'कोणीही यावे टपली मारुन जावे'
अशी परिस्थिती आहे.