Tuesday, July 14, 2009

Megacity, panvel,Navi mumbai (मेगासिटी, पनवेल,नवी मुंबई)

जगातील क्रमांक दोनचे व भारतातील क्रमांक एकचे ऊर्जा शहर म्हणजेच "एनर्जी सिटी" आमच्या पनवेलजवळ व माझ्या शिवकर गावाजवळ होत आहे याचा आम्हा भुमीपुत्रांना फार आनंद होत आहे.मा.मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली
होत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात 50,000 कोटी रु.ची गंुतवणूक आहे.तसेच 2100 एकरच्या विस्तृत जमिनीवर पसरलेला हा अशा प्रकारचा पहीलाच प्रकल्प असणार आहे.मुबईवरील ताण कमी करणे हा या प्रकल्पाचा प्राथमिक हेतु असला तरी परदेशात स्थायिक असणारे अनिवासी भारतीयांसाठी
अलिशान निवासस्थाने,आयटी हब,बॉलीवुड सिटी,टेलीकॉम सिटी,दर्जेदार पायाभुत सुविधा तसेच अनेक वैशिष्टयपुर्ण बाबींचा यात समावेश आहे.हे शहर प्रामुख्याने एनर्जी सिटी,एण्टरटेनमेंट सिटी व आयटी टेलीकॉम सिटी या तीन भागांत विकसित होत आहे.मुंबईपासुन केवळ 70 किमी व नवी मुंबईच्या नियोजीत
अंातरराष्ट्रीय विमानतळापासुन 6-7 किमी अंतरावर असल्याने येथील विकासकामांना वेग आला आहे.त्यामुळे येथे 7.5 लक्ष रोजगारनिर्मीती होणार आहे.स्थानिक भुमीपुत्रांना भराव व बांधकाम याकामी प्राधान्य देण्याचे विकासकांचे धोरण नक्कीच स्तुत्य आहे.परंतु येथील मोठ्या प्रमाणात असणारा नवोदीत तरुण वर्ग मात्र बेरोजगार आहे.विकासकांनी
येथील तरूणांना योग्य प्रशिक्षण देवुन संबंधीत आस्थापनांमध्ये कायम सेवेत घ्यावे.या ठीकाणी
कँाग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्याकडून त्यांच्या फार अपेक्षा आहेत.रिलायन्स सेझ व नुकतेच घडलेले ओएनजीसीने येथील प्रकल्पग्रस्त भुमीपुत्रांच्या तोंडाला पाने पुसण्याचे प्रकरण ताजे असल्याने या पार्श्वभुमीवर शासनाने व विकासकांनी याचा सर्वंकष विचार करावा.व प्रकल्प यशस्वीरित्या साकारावा.
"प्रकल्पासाठी हार्दीक शुभेच्छा!"

प्रथम संपादीत-15-3-2010(15मार्च2010)
-4:26pm

No comments:

Post a Comment